कृषी महाविद्यालय
कृषी महाविद्यालय

सोनई – येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांच्या सरळसेवा भरती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यामध्ये प्रतीक लांडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त, लहू गाढवे यांची कृषी उपसंचालक, पूजा गोर्डे यांची सहाय्यक आयुक्त (नवी मुंबई), गौरव क्षीरसागर, विशाल बोडखे, श्रेयस धुमाळ आणि मयूर काळे यांची तालुका कृषी अधिकारी, ज्ञानेश कमानदार यांची मंडळ कृषी अधिकारी, मनिषा खेडकर यांची पोलीस उपनिरीक्षक तर सोमनाथ दडस यांची कर सहाय्यक पदावर निवड झाली आहे.

कृषी महाविद्यालय

या सर्व यशस्वी अधिकाऱ्यांचे मुळा एज्युकेशन संस्थेचे संस्थापक यशवंतराव गडाख, माजी मंत्री शंकरराव गडाख, अध्यक्ष प्रशांत गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख, माजी सभापती सुनिता गडाख, सचिव उत्तम लोंढे आदींनी अभिनंदन केले. माझ्या यशाचा पाया कृषी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरणामुळे भक्कम झाला. विविध सनदी अधिकारी व प्रशासकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे मला स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण झाली.

कृषी महाविद्यालय

महाविद्यालयातील ‘स्पर्धा परीक्षा फोरम ‘मुळे गटचर्चा व सरावाच्या माध्यमातून माझी
भक्कम तयारी झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरतो, असे सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झालेले विद्यार्थी प्रतीक लांडे यांनी सांगितले. कृषी महाविद्यालयात शिक्षण घेताना मला केवळ कृषिविषयक ज्ञानच नाही, तर नेतृत्वगुण, समस्या सोडवण्याची क्षमता आणि जबाबदारीची जाणीव विकसित झाली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. प्रशासनात कार्यक्षमतेने काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे सहाय्यक आयुक्त पूजा गोर्डे यांनी सांगितले.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी महाविद्यालय
कृषी महाविद्यालय

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी महाविद्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!