रसायनशास्त्र
रसायनशास्त्र

सोनई – मुळा एज्युकेशन सोसायटीचे फार्मसी महाविद्यालय, सोनई आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विभागासाठी विविध विषयांवर परिसंवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोनई महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र पदव्युत्तर विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या दोन संघांनी सहभाग नोंदविला होता.

रसायनशास्त्र

दिक्षा अढेराव, मोनिका दातीर, मयुरी लाहोरे, अनिशा ढोकणे, मयुरी तांबे आणि जया जगताप यांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. तसेच ऋतुजा दरंदले, वैष्णवी दरंदले, ज्ञानेश्वरी गाडेकर,प्रतीक्षा वने, दर्शन तुवर आणि अभय दारकुंडे यांच्या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

रसायनशास्त्र

या यशासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. बाळासाहेब खेडकर तसेच रसायनशास्त्र विभागाचे प्रा. विरेंद्र दरंदले आणि प्रा. कावेरी ढोकणे यांचे मार्गदर्शन लाभले.

रसायनशास्त्र

विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख, जयश्री गडाख, संस्थेचे सचिव उत्तम लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख यांनी अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापूरे, डॉ. अशोक तुवर, डॉ. संदीप खेडकर, डॉ. संभाजी दराडे, डॉ. एम. जे. शेख आदींसह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

रसायनशास्त्र

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रसायनशास्त्र
रसायनशास्त्र

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रसायनशास्त्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!