आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अंगणवाडी

नेवासा : देशव्यापी संपात सहभागी होत अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी युनियनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी नेवासा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कामगारविरोधी, मालक धार्जिण्या चार श्रमसंहिता ताबडतोब मागे घ्या व सर्व कामगार कायदे पुन्हा बहाल करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ण वेळ, कायमस्वरूपी व वैधानिक पदांवरील कामासाठी दिला जाणारा मोबदला मानधन नाही, तर वेतन आहे म्हणून त्यांना ग्रॅच्युईटी लागू करा.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना वर्ग-३ व ४ च्या कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी, महागाई भत्ता, अन्य सर्व भत्ते, तसेच ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी व मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू करा, यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरूडे व पोलिस उपनिरीक्षक शैलेश ससाणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी नेवासा तालुक्यातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस अंगणवाडीसेविका, मदतनीस कर्मचारी युनियनतर्फे गुरुवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अंगणवाडी
अंगणवाडी
अंगणवाडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अंगणवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!