आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
भास्करगिरी

देवगड येथे विश्व हिंदू परिषद हितचिंतक नोंदणी अभियानाचा शुभारंभ; संत – महंतांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

भास्करगिरी

देवगड : देशाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विश्व हिंदू परिषदेचे योगदान अनन्यसाधारण आहे. हितचिंतक नोंदणी अभियानाच्या माध्यमातून परिषदेचे कार्य अधिक व्यापक होण्यास मदत होणार असून, देश, देव आणि धर्म ही संकल्पना हिंदू समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केला.

भास्करगिरी

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री स्व. अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात विश्व हिंदू परिषद हितचिंतक नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ श्रीक्षेत्र देवगड येथे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी अभियानाचे महत्त्व विशद करत अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

या प्रसंगी बजरंग दल प्रांत साप्ताहिक मिलन प्रमुख भास्कर भगत, संत संपर्क प्रमुख प्रशांत बहिरट, बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक, तालुकाध्यक्ष बापूसाहेब नजन, गणेश महाराज चौधरी, अनिकेत कर्डिले, आदित्य वाघ आदी उपस्थित होते.

भास्करगिरी


स्व. अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या अभियानाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

भास्करगिरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

भास्करगिरी
भास्करगिरी
भास्करगिरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

भास्करगिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!