आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गोमांस

नेवासा : नेवासा खुर्द येथील नाईकवाडी मोहल्ला परिसरातील खाटीक गल्ली येथे अवैध गोमांस विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे नेवासा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एका महिलेच्या राहत्या घरातून अंदाजे १३ किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ३ हजार ९०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोमांस

दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना नेवासा खुर्द येथील नाईकवाडी मोहल्ला, खाटीक गल्ली परिसरात एका महिलेच्या राहत्या घरात गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

गोमांस

त्यानुसार पोलीस पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी सायमा मतीन चौधरी (रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द) ही महिला घराच्या दरवाजाजवळ बसलेली आढळून आली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता जिन्याखाली अंदाजे १३ किलो गोवंशीय मांस आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष पंचनामा करून सदर मांस जप्त केले.

त्यानंतर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, नेवासा यांना बोलावून जप्त केलेल्या मांसाचे नमुने रासायनिक तपासणीसाठी घेण्यात आले. हे नमुने दोन पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले असून उर्वरित मांस नष्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोमांस

या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी हिना अलिम बागवान यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १००१/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम ५(क) व ९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष शिंदे करीत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक फौजदार जी. बी. नागरगोजे, पोलीस कर्मचारी सुमित करंजकर, सलमान शेख, परमेश्वर गहाळ, गणेश फाटके आणि महिला पोलीस कर्मचारी हिना बागवान यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे नेवासा परिसरात अवैध गोमांस विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

गोमांस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोमांस
गोमांस
गोमांस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोमांस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!