आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
फ्रिज

नेवासा : मार्च महिना सुरू झाल्याने जिल्हाभर उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्यामुळे गरिबांचे फ्रिज म्हणून ओळखले जाणारे रांजण – माठ बनवण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, काही गावांच्या आठवडे बाजारात हे माठ दखल झाले आहेत.

फ्रिज

नेवासा तालुक्यात गेल्या सहा महिन्यांपासून रांजण- माठ बनवण्याचे काम सुरू आहे. कुंभार समाज बांधव मातीपासून माठ बनवतात. या बनवलेल्या माठात चार आठ दिवस पाणी थंडगार राहते या पाण्यामुळे सर्दी-खोकला होत नाही. थंडगार पाण्याला गोडवादेखील चांगला राहतो. त्यामुळे ग्रामीण भागात या माठ रांजणाला मोठी मागणी असते. ग्रामीण भागात या माठाला गरिबांचा फ्रीज म्हणूनदेखील बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून माठ – रांजण बनवण्यासाठी लागणारी माती लवकर उपलब्ध होत नाही. माठ बनवण्यासाठी लागणारी माती मिळत नसल्यामुळे कुंभार समाज बांधवांना मोठी कसरत करावी लागते.

फ्रिज

यावर्षीची उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात रांजण, माठ, चुली, गाडगे, मडके बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, बाजारात देखील माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

माठातील पाण्याची चव भारीच ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये माठ रांझणातील पाणी पिण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. माठ रांजणातील पाणी किमान चार-आठ दिवस थंड राहते. पिण्यासाठी हे पाणी चवदार लागते त्यामुळे ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये माठ रांजनातील पाणी पिण्यासाठी प्रामुख्याने वापरतात म्हणून माठ रांजणाला उन्हाळ्यात मोठी मागणी असते.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

फ्रिज
फ्रिज
फ्रिज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

फ्रिज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!