नेवासा – नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पुरेशी पटसंख्या उपलब्ध असतानाही संचमान्यतेच्या प्रस्तावांवर कार्यवाही न झाल्याने शिक्षक पदे कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य पदकपातीमुळे शिक्षक वर्गात तीव्र असंतोष पसरला असून, न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षकांनी सुरू केली आहे.
शासनाच्या निकषांनुसार आवश्यक विद्यार्थी संख्या पूर्ण असतानाही नव्या शैक्षणिक वर्षासाठी मंजूर होणाऱ्या संचमान्यतेत पदे कमी होण्याची भीती वर्तवली जात आहे. विद्यार्थी संख्या कायम असताना शिक्षक पदे कमी करणे अन्यायकारक असून, यामुळे एकाच शिक्षकावर अनेक वर्गांचा ताण येईल व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरेल, असे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे. वारंवार पाठपुरावा करून आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करूनही संचमान्यतेमध्ये दुरुस्ती होत नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

याप्रश्नी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित मतदारसंघाच्या आमदारांनी तातडीने हस्तक्षेप करून पदे कमी होणार नाहीत यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती शिक्षकांनी केली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात वैयक्तिक लक्ष घालून न्याय द्यावा व अन्याय टाळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जर पदकपात कायम राहिली तर या निर्णयाविरोधात शिक्षण न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा शिक्षकांनी दिला असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







