२६ लाखाला ऑनलाइन गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल
आपला जिल्हा-उपनगरातील सावेडीतील व्यावसायिकाला ऑनलाइन हॉटेल रेटिंग देण्याचे आमिष दाखवून २५ लाख ९४ हजार ३९० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस दाखल ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने ६ मार्च २०२६ रोजी फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ६ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी दीपक नायर उर्फ नविनराज आणि मेघा उर्फ मालू या दोघांनी व्हॉट्सपच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला.

हॉटेलला ऑनलाइन रेटिंग दिल्यास तुम्हाला २० ते ३० टक्के नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने संशयित आरोपींना रक्कम दिली. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून दीपक नायर पोलिसांनी आणि मेघा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

