
नेवासा – नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे उतारे मिळण्याचा मार्ग आता सुकर झाला असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली
2014मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी शपथ घेतल्यानंतर सर्वांसाठी घरे ही संकल्पना मांडली आणि या माध्यमातून घरकुल पासून वंचित लाभार्थ्यांना घरकुले मिळाली. यामध्ये शासकीय जागेवर राहणाऱ्या लोकांना तांत्रिक अडचणी येत होत्या.

25 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार ही अडचण शासनाने दूर करून शासकीय जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना 500 चौरस फूट पर्यंत विनामूल्य तसेच 500 चौरस फुटापेक्षा जास्त व 1500 चौरस फुटाच्या आतील जागेसाठी 10 टक्के रक्कम भरून हक्काचे उतारे त्या कुटुंबाच्या नावावर होणार आहे.

नेवासा नगरपंचायत हद्दीतील मधमेश्वर नगर,गंगानगर, लक्ष्मी नगर, मारुती नगर, खळवाडी, संभाजीनगर या भागातील लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे, सदर योजनेतील लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी 2011 पूर्वीचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी करता वॉर्ड /प्रभाग निहाय तयार केलेल्या मतदार याद्या, विज बिल, मालमत्ता कराची पावती किंवा निवासी पुराव्यासाठीचे इतर शासकीय दस्तावेज, ग्रामपंचायत मधील आठ अ उतारा, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणाची यादी सूचना हे यापैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
या पूर्ण प्रक्रियेसाठी शासकीय समिती, जिल्हास्तरीय आढावा समिती, विधानसभा आढावा समिती गठीत करण्यात आली आहे. विधानसभा क्षेत्र समितीमध्ये समितीचे अध्यक्ष म्हणून आमदार विठ्ठल लंघे असणार आहेत
या शासन निर्णयामुळे नेवासा शहर हद्दीतील 1200 कुटुंबांना हक्काची घरे आणि हक्काची जागा मिळणार आहे. यासाठी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री सुमेत्राजी पवार, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे आभार मानले.

आमदार विठ्ठलराव लंघे यांची लवकरच भेट घेऊन शासन निर्णयाप्रमाणे गठीत आढावा समितीची बैठक घ्यावी व त्यामध्ये या लाभार्थ्यांच्या मेळावा घेण्यासाठी नियोजन करण्यात यावे अशी विनंती करणार आहे.
– राजेंद्र निंबाळकर ( श्रावणबाळ माता पिता संघटना अध्यक्ष)
आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रयत्नाला यश आले असून अनेक बेघर कुटुंबांना घर मिळणार असल्याने पेढे वाटून आनंद उत्सव साजरा.बोले तैसा चाले या म्हणी प्रमाणे चालणारे आमदार विठ्ठलराव लंघे यांचे तमाम नेवासकरांच्या वतीने जाहीर आभार. – राम केंदळे ( माजी पंचायत समिती सदस्य )

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







