आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
दिवाळी

नेवासा – दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि आपुलकीचा सण. मात्र फटाक्यांच्या धुराने आणि आवाजाने हा आनंद गढूळ होतो. त्यामुळे फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश ज्ञानोदय इंग्लिश स्कूल व कै.सौ. सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालय नेवासा येथील विद्यार्थ्यांनी दिला.

गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी विद्यालयात प्रदूषणमुक्त दिवाळी हा जनजागृतीपर उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची सामूहिक शपथ घेतली.

दिवाळी

फटाक्यांमुळे होणारे वायु व ध्वनिप्रदूषण, त्याचा मानवी आरोग्यावर, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती तसेच मुक्या प्राणी-पक्ष्यांवर होणारा विपरीत परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. फटाक्यांचा धूर हवेची गुणवत्ता बिघडवतो, तर त्याचा प्रचंड आवाज अनेकांना असह्य होतो. त्यामुळे सण साजरा करताना निसर्गाचा आणि इतरांच्या आरोग्याचा विचार करणे हीच खरी दिवाळी असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी दिवे, पणत्या आणि पर्यावरणपूरक सजावटीने दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला. वृक्षसंवर्धन, परिसर स्वच्छता आणि पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

दिवाळी

याप्रसंगी प्राचार्य रावसाहेब चौधरी म्हणाले की, दिवाळीचा खरा आनंद प्रकाशात आहे, प्रदूषणात नाही. काही सेकंदांच्या आनंदासाठी आपण पुढच्या पिढीचे आरोग्य धोक्यात घालू शकत नाही. म्हणून दिव्यांची दिवाळी साजरी करूया, धुराची नाही. ही शपथ फक्त शाळेपुरती न ठेवता घरोघरी पोहोचवावी, हेच खरे पर्यावरणप्रेम होईल.

प्राचार्य रावसाहेब चौधरी, प्राचार्या सुरेखा पारखे, पर्यवेक्षक सुनील धस, पर्यवेक्षक अरुण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय आखाडे यांनी सर्वांना सामूहिक शपथ दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

दिवाळी

स्वतः फटाके न फोडण्याचा संकल्प करत कुटुंबीयांना व परिसरातील नागरिकांनाही प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी प्रेरित करण्याचे आवाहन शिक्षकांनी केले. निसर्गाचे रक्षण ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

याप्रसंगी प्राचार्य रावसाहेब चौधरी, पर्यवेक्षक सुनील धस, पर्यवेक्षक अरुण चौधरी, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवाळी
दिवाळी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दिवाळी
दिवाळी
दिवाळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दिवाळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!