उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळासाठी शिधा वाटप; नागरिकांकडून आभार व्यक्त
नेवासा : नेवासा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन, गोरगरीब व गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उदात्त हेतूने शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष पुढाकारातून तालुक्यातील विविध गावांमध्ये गरजू कुटुंबांना दिवाळी सणानिमित्त शिधा वाटप करण्यात आले.

दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना सणासुदीच्या काळात काहीसा दिलासा मिळावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या सामाजिक भावनेतून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांपर्यंत शिधा पोहोचवून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
समाजातील वंचित, गरजू आणि गोरगरीब घटकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

या शिधा वाटपामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून, त्यांच्या दिवाळीत आनंदाची भर पडली आहे. यावेळी लाभार्थी नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे मनापासून आभार मानले.
“आमच्या अडचणीच्या काळात आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मदतीचा हात दिला. या शिध्यामुळे आमच्या दुःखात सुखाची भर पडली असून, आमची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली. त्यांनी केलेले हे कार्य आमच्यासाठी मोलाचे आहे,”अशा भावना लाभार्थी नागरिकांनी व्यक्त केल्या.

एकूणच, सणासुदीच्या काळात गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचा हा सामाजिक उपक्रम नेवासा तालुक्यात कौतुकाचा विषय ठरत आहे.
या सिदा वाटप कार्यक्रमप्रसंगी अश्फाक शेख, संभाजी पोटे, गौरव देशमुख,गणेश कोहक, विशाल कोहक, रवी औटी, सागर शिंदे, अमोल निकम, गणेश दळवी, दिगंबर निकम आदी लाभधारक शिवसेनेचे पदाधिकारी व सलाबतपुर ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







