
नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) मध्ये श्री. सुनिल धस, श्री. किरण धाडगे, श्री. राजेंद्र चारुडे, श्री. जयराम कोकतरे आणि श्री. संजय आखाडे हे उत्तीर्ण झाले आहेत. तसेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) मध्ये श्री. सुनिल धस, श्री. गोविंद गायकवाड आणि श्री. संजय आखाडे यांनी यश मिळवले आहे.

या यशस्वी शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रा. ह. दरे, उपाध्यक्ष मा. डॉ. विवेकजी भापकर पाटील, सचिव मा. ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव मा. श्री. मुकेशजी मुळे, खजिनदार मा. ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, कार्यकारी मंडळाचे सदस्य मा. श्री. शंतनुजी हापसे पाटील, सदस्या मा. ॲड. अलकाताई जंगले, तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. रावसाहेब चौधरी आणि पर्यवेक्षिका मा. श्रीमती सुनिता दिघे उपस्थित होते.

यशस्वी शिक्षकांचे सर्व मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधिक बळकट झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







