नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांची जयंती प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप यांच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास युवक व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमात पत्रकार गणेश चौगुले यांनी महाराप्रताप यांचे विचार मांडून ,घोषणा देऊन एक आक्रमक भूमिका मांडत महाराणा प्रताप यांच्या विचारांचा जागर केला ,तसेच पोलीस पाटील आदेश साठे यांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांवर भाष्य करत युवकांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. नगरसेवक कृष्णा परदेशी यांनी महाराणा प्रताप हे संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे सांगत समाज एकजुटीची गरज व्यक्त केली. तसेच गणेश झगरे यांनीही आपले विचार मांडताना युवकांनी इतिहासाचे भान ठेवून सामाजिक कार्यात पुढे यावे, असे मत व्यक्त केले.

यावेळी प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बादल परदेशी यांनी महाराणा प्रताप यांच्या कार्याची माहिती देत त्यांचे प्रेरणा घेण्याचा संदेश दिला . तसेच यावेळी बादल परदेशी यांची जागतिक मानवाधिकार संघटनेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गणेश झगरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेवासा तालुका, प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्याचे पत्र शिवसेनेचे नेते मुन्ना चक्रनारायण तसेच मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

तसेच या कार्यक्रमाप्रसंगी सचिन परदेशी, रुद्र परदेशी,कृष्णा नेमाने, पप्पू हांडे ,बाबासाहेब इंगळे, उत्तम विटकर , दैनिक लोक परिवर्तन चे संपादक आबासाहेब शिरसाठ , जागतिक मानवाधिकार संघटनेचे संस्थापक राजेंद्र लिंगाडे ,पत्रकार सचिन कुरुंद, केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे राऊत पाटील,पत्रकार सुमित पठारे ,वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणपतराव मोरे, नंदू चक्रनारायण,अभिषेक शिंदे,उत्तम विटकर, नारायण सिंग राजपूत,पप्पू परदेशी, अनिल परदेशी, सचिन परदेशी, पवन परदेशी, मेजर आल्हाट, मंगेश भालेराव,साहेबराव धोत्रे ,संदीप सोनवणे ,नंदू बर्डे, उत्तम विटकर, शिवसेनेचे नेते मुन्ना चक्रनारायण, विजय भाऊ नहार, अनिल महाराज भंनगे, भास्कर मामा, सह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







