
नेवासा – सहकार क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत ग्राहक, लघुउद्योजक आणि शेतकरी सभासदांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या बुलढाणा अर्बन संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत नेवासा शाखेच्या वतीने मयत कर्जदाराच्या वारसास अपघाती विमा धनादेशाचे वितरण करण्यात आले.

मौजे भानस हिवरा (ता. नेवासा) येथील रहिवासी व संस्थेचे सभासद स्व. राजेंद्र गंगाधर भोईटे यांनी दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी नेवासा शाखेतून १,४५,००० रुपयांचे सोनेतारण कर्ज घेतले होते. दरम्यान, १० जानेवारी २०२६ रोजी त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला.

संस्थेच्या योजनेनुसार ठेवीदारांना त्यांच्या ठेवीएवढे व कर्जदारांना कर्जरकमेएवढे अपघाती विमा संरक्षण दिले जाते. सदर घटनेची माहिती मिळताच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक (भाईजी), अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर तसेच सरव्यवस्थापक कैलास कासट यांच्या आदेशानुसार आणि विभागीय व्यवस्थापक रमेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक ईश्वर काकडे यांनी भोईटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व विमा प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा प्रस्ताव मुख्यालयाकडे सादर करण्यात आला. या योजनेअंतर्गत ICICI Lombard कंपनीने स्व. भोईटे यांच्या कर्जाची व्याजासह एकूण १,६१,७२० रुपयांची विमा रक्कम मंजूर केली.

आज (दि. ५ मे २०२६) रोजी ही रक्कम मयत सभासदांच्या वारसदार सौ. सविताबाई राजेंद्र भोईटे यांना प्रदान करण्यात आली. तसेच सोनेतारण कर्ज खात्यातील सोने वस्तू प्रतिष्ठित सभासद डॉ. रोहित पाटील, राजेंद्र वाघमारे, सोपान गुंजाळ, विजय धनाळे, किरण गरड व संतोष उंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.
या प्रसंगी शाखा व्यवस्थापक ईश्वर काकडे व शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







