नेवासा फाटा – मक्तापूर रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात झालेल्या रस्ता रोको आंदोलनात संबंधित ठेकेदार शेख यांनी “मला कोणताही निधी मिळालेला नाही” असा दावा केल्याचे सांगितले जात असताना, ग्रामस्थांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत ठेकेदाराला धारेवर धरले.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, निधी मिळाला नसेल तर काम स्वीकारले कशाच्या आधारावर? आणि अनेक वर्षे नागरिकांना अडचणीत का ठेवले? असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असताना जबाबदारी टाळण्याऐवजी स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी ग्रामस्थांनी आरोप केला की, कामाच्या दर्जाबाबत आणि प्रगतीबाबत नागरिकांना समाधानकारक माहिती दिली गेली नाही. “निधी नसल्याचे कारण पुढे करून नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका,” असा संतप्त सूर आंदोलनात उमटला.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, संबंधित कामाची निधीस्थिती, कामाचा करार, कामाची प्रगती आणि विलंबाची कारणे सार्वजनिक करावीत. तसेच कामात त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी.
“रस्ता मंजूर झाला, काम सुरू झाले; मग आज नागरिकांना धूळ, खड्डे आणि कारणेच का?” असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा इशारा दिला.

यावेळी अहिल्यादेवी चौकात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते याप्रसंगी गणेश झगरे, भारत पवार सचिन गव्हाणे भानुदास शिरसाट सुनील साठे अमोल शिरसाठ रामेश्वर नवले सोपान शिरसाठ किशोर शिरसाठ सचिन गव्हाणे भारत पवार योगेश शिरसाट शिरसाट संभाजी रामदास गव्हाणे शहराम शिरसाट सह आदी ग्रामस्थांच्या सह्या निवेदनावर आहे


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







