
नेवासा – नेवासा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार यांनी स्थापित केलेल्या अलअमीन उर्दू हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.शंभर टक्के निकालाची परपंरा या विद्यालयाने कायम ठेवली आहे.

अलअमीन उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी कु.सामीया शोएब शेख ८२.६० टक्के प्रथम,कु.मुबश्शिरा मोहंमद पठाण ७८.४० द्वितीय,कु.मन्तशा इरफान कुरैशी ७५.६० टक्के तृतीय,कु.अमना अमीन शेख ७५ टक्के चतुर्थ,कु.आईशा मोहसीन शेख ७३.८० टक्के पाचवी यांनी विशेष यश संपादन केले.

यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य महंमदभाई आतार,विश्वस्त मौलाना ईबतेहाजोद्दीन काझी,आजमखान पठाण,फारूकभाई आतार,सादिक पटेल,शमीमभाई सय्यद,फारूक रज्याक कुरैशी,फकीर मोहंमद अत्तार,सलीम शेख, मुख्याध्यापक अन्सार पठाण,सर्व शिक्षक वृंदासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







