निष्पक्ष तपास, मास्टरमाईंडचा शोध आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी; १२ ऑगस्टला शिव महाराणा प्रताप चौका नेवासा फाटा येथे निषेध शोकसभा
नेवासा प्रतिनिधी.अहिल्यानगर येथे ७ ऑगस्ट रोजी घडलेल्या धीरज परदेशी हत्याकांडाचे पडसाद आता नेवासा तालुक्यात उमटू लागले असून, या घटनेच्या निष्पक्ष व जलद तपासासाठी विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. सकल राजपूत समाज ,व सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राजपूत करणी सेना, वतीने प्रशासनाला निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

धीरज परदेशी यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या पतीच्या कपाळावर भगवा टिळा असल्याच्या कारणातून समाजकंटकांनी निर्घृण हत्या केल्याचा दावा केला आहे. हा दावा अत्यंत गंभीर असून, त्याची सत्यता तपासातून स्पष्ट करावी आणि या घटनेमागे कोणताही सूत्रधार किंवा मास्टरमाईंड असल्यास त्याचा शोध घ्यावा, अशी संतप्त मागणी राजपूत करणी सेनेचे युवा तालुका अध्यक्ष बादल परदेशी यांनी केली आहे.
तसेच नगरसेवक कृष्णा परदेशी यांनी आक्रमकता घेत या हत्याकांडामागील प्रत्येक कडी तपासली पाहिजे. प्रत्यक्ष आरोपी कोण, त्यांना कोणी प्रवृत्त केले, याची मागणी केली तसेच करणी सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील परदेशी यांनी घटनेमागे कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास झाला पाहिजे याची मागणी केली. करणी सेनेचे तालुका अध्यक्ष संदीप उर्फ पप्पू परदेशी यांनी तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि इतर उपलब्ध पुरावे तपासून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी यावेळी प्रशासनाला केली .

तसेच यावेळी राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल परदेशी यांनी धीरज परदेशी याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली, तसेच ज्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली होती त्या मुकुंद नगर परिसराला धीरज नगर नाव देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली
“धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे; तपासात कोणाचाही दबाव चालणार नाही; दोषी कोणताही असो, कायद्याच्या कचाट्यात आला पाहिजे,” अशी भूमिका यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मामा वाघ यांनी मांडली.
तसेच धीरज च्या हत्या करणारे हे हैदराबादला पळून जातात त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणारा कोण आहे व त्याचा शोध घ्यावा अशी मागणी भाजपचे नेते मनोज पारखे यांनी केली ,व निरंजन डहाळे यांनी तीव्र शब्दात झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला

दरम्यान, धीरज परदेशी हत्याकांडाच्या निषेधार्थ बुधवार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात निषेध शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सकल समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निषेध सभेत न्यायाची मागणी अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येणार असून, दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत कायदेशीर व लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याची भूमिका आयोजकांनी घेतली आहे.
निवेदन देताना राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठल परदेशी ,राजपूत करणी सेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ परदेशी, नेवासा तालुकाध्यक्ष संदीप परदेशी, नेवासा युवा तालुकाध्यक्ष बादल परदेशी, नेवासा शहराध्यक्ष सचिन भाऊ परदेशी, नेवासा फाटा शहराध्यक्ष अनिल भाऊ परदेशी, जळके शाखाध्यक्ष नवीनचंद परदेशी यांच्यासह निखिल जोशी, श्रावण रेनिवाल, ज्ञानेश्वर आवारे, सचिन कदम, आकाश गावंडे, चांगदेव नरोडे, दीपक परदेशी, नगरसेवक कृष्णा परदेशी उपस्थित होते.

तसेच भाजपचे नेते मनोज पारखे, दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाठ, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राजेंद्र लिंगाडे, गणेश पारकर, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब मामा वाघ, आकाश एरंडे, सुरज परदेशी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
धीरज परदेशी हत्याकांडाचा तपास निष्पक्षपणे करून संपूर्ण सत्य बाहेर काढावे, सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
१२ ऑगस्टला शिव महाराणा प्रताप चौकात होणाऱ्या निषेध शोकसभेकडे आता प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








