आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
विद्यार्थी

सौंदाळा, ता. नेवासा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा येथे शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या आणि सणानिमित्त गावी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्यासाठी बाहेरगावी नोकरीसाठी असणारे सौंदाळा गावातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थान राजेंद्र मुरकुटे यांनी भूषवले.

विद्यार्थी

सौंदाळा गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे सर्व माजी विद्यार्थी गावाचे आणि शाळेचे भूषण आहेत. यामध्ये न्यायाधीश, DYSP, RTO, पोलीस कॉन्स्टेबल, फार्मासिस्ट, कंपन्यांचे अधिकारी, API, मिलिटरीमध्ये नोकरी करणारे जवान, अनेक प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, व्यापारी, शेतकरी आदींचा समावेश होता.

सर्व माजी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम शाळेमध्ये चाललेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. पूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा यामधील बदल आपल्या अनुभवातून कथन केला. शाळेने आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या उत्तुंग झेपेबद्दल सर्वांनी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

विद्यार्थी

शाळेने आदर्श शाळा स्पर्धेत जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल तसेच मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. तसेच सौंदाळा ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पंचायतराज अभियानामध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांनी सरपंच व सदस्यांचा सत्कार केला.

मनोगत व्यक्त करताना न्यायाधीश दिनकर आरगडे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील गमतीजमती, मित्रांबरोबरच्या खोड्या व आनंदाचे क्षण सांगितल्याने सर्वजण काही काळ भूतकाळात गेले. “लहानपण देगा देवा” या तुकोबांच्या ओळीची अनुभूती सर्वांना आली.

यावेळी केंद्रप्रमुख संजय गोरे, प्राथमिक शिक्षक सिताराम आरगडे, हरिभाऊ आरगडे, संभाजी आरगडे, जिजामाता विद्यालयाचे माजी प्राचार्य पंडित सर, चापडगाव विद्यालयाचे माजी प्राचार्य भगवान आरगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थी

सरपंच शरद आरगडे यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. माजी विद्यार्थी संघाच्या सूचनेनुसार शाळेमध्ये अद्ययावत व सुसज्ज ग्रंथालयासाठी खोली बांधून देण्याचे कबूल केले. शाळेतील व गावातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त ग्रंथालय उभारण्याचे आश्वासन दिले.

अध्यक्ष राजेंद्र मुरकुटे यांनी आपल्या उत्कृष्ट व अलंकारिक मनोगतातून शाळेचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. “कोणतेही गाव सुधारायचे असेल तर गावातली शाळा सुधारली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी तन-मन-धनाने प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सौंदाळा शाळेसाठी ११ हजार रुपयांची रोख देणगी दिली.

सर्वानुमते माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र मुरकुटे यांची निवड करण्यात आली.

विद्यार्थी

यावेळी उपस्थित मान्यवर : सरपंच शरद आरगडे, न्यायाधीश दिनकर आरगडे, DYSP संभाजी मुरकुटे, RTO प्रमोद आरगडे, बाळासाहेब झावरे, पोलीस कॉन्स्टेबल ताराचंद आरगडे, हरिश्चंद्र आरगडे, भारतीय सैन्य दलातील जवान, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आरगडे, माजी अध्यक्ष भारत आरगडे, बाबासाहेब आरगडे, बाबासाहेब बोधक, संजय गोरे, विजय मुरकुटे, संभाजी आरगडे, माजी प्राचार्य भगवान आरगडे, बाळासाहेब पंडित, शाळेतील शिक्षक अशोक पंडित, अनिल टेकणे आणि किशोर विलायते आदी उपस्थित होते.

विद्यार्थी

विद्यार्थी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विद्यार्थी
विद्यार्थी
विद्यार्थी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विद्यार्थी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!