अनिल नाबदे यांच्या संकल्पनेतून आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, विजेत्यांना आकर्षक बक्षिसांचे वितरण… पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची नांदी….
शिरसगाव (प्रतिनिधी) : दिवाळी व दिवाळी पाडव्याच्या सणाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील महिला भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांना मनोरंजनाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अनिल नाबदे यांच्या संकल्पनेतून ‘न्यू कॉमेडी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा, सन्मान गृहिणीचा’ हा विशेष कार्यक्रम शिरसगाव येथे उत्साहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस इलेक्ट्रिक स्कूटी अनिता अरुण मोटकर (माळी चिंचोरा) यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रेफ्रिजरेटर (फ्रिज) योगिता दीपक काळे (चिकणी खामगाव) यांना देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस टेबल फॅन शिवाजी जपे (नेवासा बुद्रुक) यांना वितरित करण्यात आले.

महिला म्हणजे प्रत्येक कुटुंबातील आदिशक्ती : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे
यावेळी बोलताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की, प्रत्येक घरातील महिला ही आदिशक्ती असून ती संपूर्ण कुटुंबाचा आधार असते. महिला आपल्या कुटुंबाला संस्कार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. या संस्कारांतूनच कुटुंब घडते, कुटुंबाची प्रगती होते आणि चांगले व्यक्तिमत्त्व निर्माण होते. हे सर्व महिलांच्या विचारातून आणि प्रेरणेतून घडत असते.
अशा महिलांना आज अनिल नाबदे यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज व महात्मा फुले यांच्या कार्याचा अनिल नाबदे यांनी केला गौरवपूर्ण उल्लेख
कार्यक्रमाचे आयोजक अनिल नाबदे यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, संत तुकाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
ते म्हणाले की, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ माता यांनी क्रांतीची बीजे पेरली. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. निजामशाही, आदिलशाही, पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यासारख्या सत्ताधीशांना ते घाबरले नाहीत. त्यांनी स्वराज्याची स्थापना करून इतिहास घडवला.
पंधराव्या ते सोळाव्या शतकातील संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा आणि अन्यायावर प्रहार केला. आपल्या अभंगांतून त्यांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले.
तसेच छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी मोठा लढा दिला. स्वराज्यासाठी कसे लढावे आणि मातृभूमीसाठी कसे मरावे, हे त्यांनी आपल्या कृतीतून या भारत देशाला आणि संपूर्ण जगाला दाखवून दिले.

अठराव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची बीजे रोवली. त्या काळात समाजामध्ये शूद्र-अतिशूद्रांसाठी संघर्ष सुरू होता.
अशा परिस्थितीत महात्मा फुले यांनी दीनदुबळ्या आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले. तसेच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती रायगडावर साजरी केली, असा ऐतिहासिक उल्लेखही अनिल नाबदे यांनी आपल्या भाषणातून केला. या पैठणी खेळाच्या आयोजनाच्या माध्यमातून भविष्यकाळातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून अनिल नाबदे हे शिरसगाव गनातून नेतृत्व करणार असल्याची जोरदार चर्चा जोर धरू लागली आहे तसेच त्यांना महिला वर्गाचे मोठे पाठबळ या माध्यमातून दिसतांना पहावयास मिळत आहे.
महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमध्ये गायत्री जपे, निकिता गायकवाड, चित्रा मिसाळ, शितल काकडे, अनिता मटकर, रंजना गाडगे, नंदिता तांगडे, रेशिमा गायकवाड, निकिता, सीमा कचरे, प्रेमा कचरे आदी महिलांचा समावेश होता.

शिरसगाव व परिसरातील महिला भगिनींनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमप्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, कार्यक्रमाचे आयोजक अनिल नाबदे, विजय नाबदे, दादासाहेब पोटे,बाळासाहेब नाबदे, शरद गरड, बाळासाहेब कदम, दीपक कचरे, ज्ञानेश्वर लोखंडे, कारभारी आगळे, रवी गव्हाणे, राजेंद्र पोटे, बाळासाहेब गोपाळे, कडुबाळ बोरुडे, प्रवीण घुले, संतोष नाबदे, संपत गोपाळे, संतोष लंघे, विलास लंघे, संदीप देशमुख, भाऊसाहेब घुले, दादासाहेब नाबदे,प्रभाकर गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिरसगाव तसेच परिसरातील महिला भगिनी, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या अनिल नाबदे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला ‘खेळ पैठणीचा, सन्मान गृहिणीचा’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







