गोवंश
गोवंश

घोडेगाव – स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे कत्तलीसाठी चालविलेल्या १३ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या प्रकरणी चौघा आरोपींकडून ३९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार अतुल लोटके, दीपक घाटकर, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, योगेश कर्डीले, किशोर शिरसाठ यांचे पथक तयार करुन सारसापथकास नेवासा तालुक्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना केल्या.

गोवंश

३ फेब्रुवारी रोजी पहाटे नेवासा तालुक्यामध्ये कृष्णानगर, घोडेगाव या ठिकाणी काही इसमांनी गोवंशीय जनावरे खरेदी करुन आणली असून ते वाहनामध्ये भरुन कत्तलीसाठी नेणार असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीप्रमाणे पथकाने खात्री केली असता काही इसम हे गोवंशीय जनावरे ट्रकमध्ये भरतांना दिसून आले.

गोवंश

पथकाने सदर ठिकाणी असलेल्या इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे रशिद जानुभाई शेख (वय ६५) रा. घोडेगाव, अमीन इसाक सय्यद (वय ३०) रा. लोहगाव, लाला उर्फ आफताब हारून शेख (वय २६) रा. घोडेगाव, शुभम बाबासाहेब पुंड (वय २६), रा. माळीचिंचोरा, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. ताब्यातील इसमांकडुन ९ लाख १० हजार रुपये किमतीची १३ गोवंशीय जनावरे, ३० लाख रुपये किमतीची टाटा कंपनीची ट्रक (एमएच ४६ एआर ६३८५) असा एकुण ३९ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द सोनई पोलीस ठाणे गु.र. नं. ३२/२०२६ महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारीत २०१५ चे कलम ५, (अ), ५ (ब), ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम ३, ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केलेली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गोवंश
गोवंश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गोवंश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!