
नेवासा – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 3 सन 2025 26 चे नुकतेच जिल्हास्तरीय परीक्षण पार पडले. नेवासा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवाली या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या अभियानानुसार अंतरवली शाळेला सन्मानचिन्ह ट्रॉफी व तीन लाख रुपये रोख असे बक्षीस जाहीर झाले आहे.

नुकताच या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती नेवासाच्या सभागृहात माननीय गटविकास अधिकारी श्री संजय लखवाल यांच्या अध्यक्षतेखाली, नगर पालिका मुख्याधिकारी फराटे साहेब,गटशिक्षणाधिकारी श्री संजय कळमकर,विस्तार अधिकारी श्रीमती शेख रुकसाना मॅडम, केंद्रप्रमुख श्रीमती कमल लाटे श्री संजय शेळके श्री रवींद्र कडू पाटील श्री बाळासाहेब काशीद यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या अभियानामध्ये शाळेच्या अंतरंग व बाह्यंगा बरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता व इतर भौतिक सुविधांचे परीक्षण करून गुणदान केले जाते. अंतरवाली शाळेमध्ये भौतिक सुविधा तसेच विद्यार्थी गुणवत्ता यामध्ये प्रचंड प्रगती झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री रविंद्र पागिरे तसेच शाळेतील इतर शिक्षिका श्रीमती लतिका कोलते व तेजश्री निमसे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री आनंद वाबळे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री राम वाबळे व अंतरवाली चे सरपंच श्री संदीप देशमुख हे उपस्थित होते.

आपल्या मनोगतामध्ये मुख्याध्यापक श्री पागिरे यांनी असे सांगितले की शाळेच्या झालेल्या या कायापालटासाठी शाळेतील सर्व ग्रामस्थ सर्व समित्यांचे पदाधिकारी यांची आर्थिक मदत महत्त्वाची ठरलेली आहे. तसेच अतिशय काटेकोरपणे याचे परीक्षण होत असल्यामुळे शाळेमध्ये प्रचंड तयारी व मेहनत शिक्षक वर्गाला घ्यावी लागली. पर्यवेक्षीय यंत्रणेचे कमालीचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल अंतर्वली शाळेतील सर्व शिक्षक वर्गाचे सर्व ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

