
घोडेगाव — गणेशवाडी सोनई रोडवर दरंदले वस्ती वर शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. या बाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी सुवर्णा राम दरंदले (वय.४०) रा. गणेशवाडी रोड या आपल्या शेती गट नं. ४९६/३येथे खुरपणीचे काम करत होत्या. त्या ठिकाणी आरोपी मिराबाई दत्तु दरंदले व दत्तु निवृत्ती दरंदले हे आले व तुम्ही आमचे शेतीच्या बांधावरुन जायचे नाही. तेव्हा फिर्यादी यांनी हा आमचा जुना रस्ता आहे असे त्यांना बोलले त्याचा राग आल्याने त्यांनी मला व माझे पती राम नामदेव दरंदले यांना काठीने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. दाखल फिर्यादी नुसार गुन्हा र. नं. ५९/२०२६ बिएन एस चे कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) (३), ३५२,३(५) प्रमाणे संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबा लबडे हे करत आहेत.

तर दुसरीकडे मिराबाई दत्तात्रय दरंदले (वय.५८) या आपल्या राहत्या घर समोर असताना यातील आरोपी बंडु नामदेव दरंदले हा त्या ठिकाणी आला व स्वत:चे अंगावरील कपडे उतरवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन माझ्याशी केले असल्याचे दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे. तुम्ही माझ्या विरुद्ध केलेली केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला जिवे ठार मारील. असे म्हणत पती दत्तात्रय दरंदले यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. दाखल फिर्यादी नुसार गुन्हा र. नं. ६०/२०२६ बिएन एस चे कलम ७४,११५(२), ३५१(२) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब तागड हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

