भानसहिवरा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नेवासा पंचायत समितीचे उपसभपाती किशोर जोजार होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन किशोर जोजार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष ढवाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालमावळ्यांची लेझीम पथकासह भव्य मिरवणूक गावामधून शिक्षक अशोक ढोले यांचे मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांनी केले व शिवाजी महाराजाच्या जीवनावर विस्तृत असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर जोजार होते. यावेळी शाळेतील बाल मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावरील भाषणे झाली. शिक्षक राजेंद्र पाचे, श्रीधर साळुंके, आशा गवळी, सुमन सोळसे, महेश देवतरसे, दत्ता चोथे, चंद्रकांत कदम, वर्षाताई कुऱ्हाडे आदींच्या वर्गातील मुलांनी प्रेरणादायी भाषणे व कला सादर केली. तर कार्यक्रम स्थळी शिक्षक महेश देवतर्षे यांच्या रांगोळीने उपस्थितांची मने जिंकली.

यावेळी बोलताना जोजार म्हणाले कि विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावे त्यांचा आदर्श घ्यावा. महिलांविषयीं आदर बाळगावा. कल्याणच्या सुभेदाराची सून राजापुढे आणल्यांनतर राजानीं तिला साडी चोळी देऊन बहिणीची वागणूक दिली, शिवरायांनी कधीही जातीभेत केला नाही, राजांच्या आरामारदलाचा प्रमुख हा मुस्लिम दौलतखान होता. अंगरक्षक पण मुस्लिम समाजाचे होते. शत्रू समुद्रमार्गे येऊ शकतो म्हणून राजांनी समुद्रात आरमारदल उभारले, म्हणून युवा पिढीने राजांचे गुण आत्मसात करावे व त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

