आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
स्थानिक गुन्हे शाखा

घोडेगाव – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.

सदर आदेशानुसार किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, दिपक घाटकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, बाळासाहेब नागरगोजे भिमराज खर्से, बाळासाहेब खेडकर, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास नेवासा तालुक्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.

दिनांक 28 रोजी सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट रा. मोरेचिंचोरे ता.नेवासा हा चारचाकी वाहनातुन गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी वांजोळी शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वांजोळी शिवारात सापळा. वांजोळीकडुन एमआयड़ीसीकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. पथकाने वाहन थांबविले असता.

तेव्हा गाडीतील चालक पळुन जावुन लागला त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट वय- 34 वर्षे रा. मोरेचिंचोरे ता.नेवसा जि. अहिल्यानगर असे असल्याचे कळविले. ताब्यातील इसमाची व कारची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल , 1000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, 5,00,000/-रु कि.चे मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण 5,31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी नामे नितीन उर्फ ठकण भाऊसाहेब आल्हाट याचेविरुध्द सोनई पोलीस ठाण्यात पाच, अहील्यानगर एम आय डी सी हद्दीत एक, येरवडा पुणे एक, नेवासा एक, भिंगार कॅम्प एक,मध्ये विविध कलमान्वये यापुर्वी गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाण्यात गु.र.नं. 78/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.

तसेच वरील नमुद पथकास गुप्त बातमीदारामार्फत शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख हा चारचाकी वाहनातुन गावठ्ठी कट्टा विक्री करण्यासाठी घोडेगाव शिवारात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी घोडेगाव शिवारात सापळा लावला असता. राजेगावकडुन घोडेगावकडे एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन येतांना दिसली. तेव्हा पथकाने वाहन थांबवुन चालकास ताब्यात घेवुन त्याचे कडे अधिक विचारणा केली असता त्याने त्याचे नांव शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख वय-31 वर्षे रा. कृष्णानगर झोपडपट्टी घोडेगाव ता. नेवासा असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन 1) 30,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र),1000/-रु कि. चे दोन जिवंत काडतुसे, 4,00,000/-रु कि.ची मारुती सुझुकी चारचाकी वाहन असा एकुण 4,31,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा

आरोपी शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख याचेविरुध्द यापुर्वी देखील सोनई पोलीस ठाण्यात 15 गुन्हे, शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात 1, वाळुंज 1, एम आय डीसी अहील्यानगर 1 अशा प्रकारे विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. 79/2026 आर्म ऍ़क्ट 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करीत आहे.

वरील प्रमाणे सोनई पोलीस स्टेशन हद्दीत दोन आरोपीविरुध्द कारवाई करुन त्यांचेकडुन 02 गावठ्ठी कट्टे व 04 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, व वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्थानिक गुन्हे शाखा
स्थानिक गुन्हे शाखा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्थानिक गुन्हे शाखा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!