नेवासा- भानसहिवरा (ता. नेवासा) येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक व ज्ञानेश्वर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधल्या विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमधून संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेड व वेबसम सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत थेट निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य एच.जे.अहिरे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्यांना शंभर टक्के नोकरीची हमी मिळावी, या हेतूने संस्थेचे संस्थापक डॉ. सुरेश बेल्हेकर यांनी ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक व ज्ञानेश्वर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला.

यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉमप्युटर, फिटर व इलेक्ट्रिशियन या शाखेतील तृतीय वर्षातील १०८ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यूहद्वारे निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बेल्हेकर, संचालिका डॉ. रंजनाताई बेल्हेकर, संचालक अभिषेक बेल्हेकर, प्राचार्य एच.जे. आहिरे उपस्थित होते. विभागप्रमुख प्रा. सुदर्शन शिंदे, प्रा. योगेश भागवत, प्रा. सुनील कांबळे, प्रा.मंजुषा शिंदे, प्रा.योगेश मानळ, प्रा. शाहरुख पठाण, प्रा. तुकाराम खाटीक, प्रा. अजय बाविस्कर, प्रा. पागिरे, प्रा.दळे, प्रा. वांडेकर, प्रा. खुळे, प्रा. कुंधारे, प्रा. शेंडगे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना १००% नोकरीची हमी मिळण्यासाठी ट्रेनिंग पेल्समेंट विभाग कार्यरत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






