नेवासा – नेवासा येथील जुन्या पेठेत असलेल्या पुरातन श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.सकाळी प्रभु श्रीराम,सितामाता, लक्ष्मण, हनुमंत मुर्तीस रुद्राभिषेक करण्यात आला.श्रीराम जन्मोत्सवाच्या किर्तन झाले महाआरती करण्यातआली. त्यानंतर पुष्पवृष्टी करत सियावर रामचंद्र की जय असा जयघोष करत झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याने सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले.

श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम नवमी निमित्त दि.१९ मार्च ते २५ मार्च या कालावधीत श्री दासबोध पारायण झाले. यावेळेत श्री गणपती आख्यान , श्रीराम रक्षा स्तोत्र पठण , गीतांजली,अभंगवाणी , उपासना, नामस्मरण, स्वाध्याय प्रवचन प.पू. पांडुरंगशास्त्री प्रेरीत स्वाध्याय प्रवचन केंद्र, दासबोध ग्रंथ मिरवणूक सोहळा, ह.भ.प. धनंजय महाराज देशपांडे यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीत रामचरीत मानस कथा या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० ते १२.३० यावेळेत श्रीराम जन्मोत्सवा निमित्ताने सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांचे कीर्तन झाले. यावेळी ते म्हणाले ” धर्माच्या नावाखाली वाईट गोष्टी करण्याला विरोध करावा. आपली भगवंतावरती श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा असता कामा नये. भगवंताचे मनोभावे भजन व पूजन केले तर जादूटोणा करण्याची गरज नाही. धर्म, संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी स्वधर्मातील वाईट माणसे व धर्मबाह्य शक्तींपासून आपण लांब राहावयास हवे. आपल्या संस्कृतीचे रक्षण आपणच करू शकतो. भूक लागली अथवा आपल्याला काही हवे असेल तर आपण आपल्या आईला ते सहज मागतो. तद्वत भगवंताकडे जाण्यासाठी, भगवंताला काही मागण्यासाठी आपल्याला कोणत्याही दलालाकडे जाण्याची आवश्यकता नाही. अशा दलालांपासून आपण दूर राहायला हवे.

प्रभू रामचंद्र हे आदर्श पती, आदर्श पुत्र ,आदर्श मित्र, आदर्श शिष्य व आदर्श शिष्य म्हणूनही सर्व जगाला माहिती आहेत. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे असे सांगताना महंत उद्धव महाराज पुढे म्हणाले, ” प्रभू रामाने विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करताना पहारेकऱ्याचे देखील काम केले कारण ते आदर्श शिष्य होते. विश्वामित्र रामाला जनक राजाच्या दरबारात घेऊन गेले. पण धनुष्य उचलण्यासाठी त्यांनी कोणताही उतावीळपणा केला नाही . विश्वामित्रांच्या आदेशाची ते वाट पाहत होते. माणसाकडे सर्व गुण असावेत पण उतावीळपणा नसावा. योग्य वेळ येण्याची वाट पहावी. धनुष्य उचलण्यासाठी जाताना त्यांनी प्रथम आपल्या गुरूंना वंदन केले. धनुष्यालाही वंदन केले . आणि नंतर धनुष्याला दोरी बांधली.

नम्रता हा रामाकडून शिकण्यासारखा गुण आहे. शेतात पाय ठेवताना, दुकान उघडताना, आपापल्या कार्यक्षेत्रात गेल्यावर प्रथम त्या जागेचे दर्शन घ्यावे, ही आमची परंपरा आहे. ती तरुणांनी चालू ठेवावी. प्रभूरामांनी सुग्रीवाला आधी मदत केली आणि नंतर त्याची मदत घेतली. मैत्री करताना अशाच पद्धतीने व्यवहार असला पाहिजे. आधी आपण मदत करावी आणि नंतर आवश्यकता असल्यास त्याच्या मदतीची अपेक्षा ठेवावी. स्वतःची पत्नी पळवून नेणाऱ्या रावणाच्या मृत्यू नंतर मंदोदरी जेव्हा युद्ध स्थळी आली तेव्हा प्रभुरामांनी तिला माते म्हणून दर्शन घेतले. शत्रूशी कसा व्यवहार करावा याचा आदर्श आपण रामाकडून घ्यावा.”

प्रभू रामचंद्र की जय चा जयघोष करत पुष्पवृष्टीद्वारे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आला.यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.सायंकाळी सामुहिक महाआरती करण्यात येवुन दिपोत्सव करण्यात आला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







