आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गावठी कट्टा

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनईजवळील श्रीरामवाडी शिवारात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

गावठी कट्टा

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी अवैध अग्निशस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व त्यांच्या पथकाने सोनई पोलीस ठाणे हद्दीत तपास सुरू केला होता.

गावठी कट्टा

दि. २६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे सोनई ते खेडले परमानंद मार्गावरील श्रीरामवाडी परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी एक संशयित इसम कॅनलजवळ बसलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल रावसाहेब विटनोर (वय २७, रा. मांजरी ता. राहुरी) असे सांगितले.

गावठी कट्टा

झडतीदरम्यान त्याच्या जवळून सुमारे ३०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा व २,००० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपीने हे शस्त्र विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे.

सदर आरोपीविरुद्ध यापूर्वीही सोनई पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असून तो फरार होता. याप्रकरणी पोहेकॉ सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादीवरून गु.र. नं. १०२/२०२६ अंतर्गत आर्म अॅक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गावठी कट्टा

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब तागड करत आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

गावठी कट्टा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गावठी कट्टा
गावठी कट्टा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गावठी कट्टा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!