
सोनई – ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी उपलब्ध असलेले राज्य शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गोरगरीब रुग्णाची हेळसांड व उपचार करण्यासाठी उत्तम सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत असून केंद्राकडून उत्तम सुविधा उपचार देण्यात यावी अशी मागणी शरद पवार मंच पक्षाचे महिला जिल्हा अध्यक्ष व अँटिकरिप्शन चे सदस्या इंदुबाई वाघ (दरंदले) यांनी केली आहे.

रुग्णांना ताटकळत राहावे लागत असून तेथे असलेले औषधं काही आहे तर काही नाही अशी अवस्था असून “हे असून अडचण, नसून खोळंबा “अशी स्थिती झाली आहे, तेथील काही डॉक्टर वेळेवर हजर नसतात, साधे सुधे उपचार करून रुग्णाची चेष्टा केली जाते, अनेक गरिबांना खाजगी दवाखान्याचा खर्च पेलवत नसल्याने ते रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घेतात, परंतु तेथील वातावरण पाहता, कित्येक लोक फक्त गप्पा मारतात असा आरोप वाघ यांनी केला आहे. रुग्णांना चागली आरोग्य सेवा पुरवावी अशी मागणी केली आहे.सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






