सोनई – यशवंत स्पोर्ट्स क्लब सोनई व माजी मंत्री शंकरराव गडाख मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी (दि. 4 एप्रिल 2025) सायंकाळी 6 वाजता उत्साहात पार पडला. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते व्हॉलीबॉल उडवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, माजी सभापती रावसाहेब कांगुणे, भारत गडाख, कारभारी डफाळ, रंगनाथ जंगले, बाबा अनारसे, दत्तात्रय बेल्हेकर, डॉ. रामनाथ बडे, सुभाष राख, अजय लोंढे, संतोष क्षीरसागर,

आप्पासाहेब निमसे, संदीप कुसळकर, अनिल भागवत आदींसह सोनई परिसर व जिल्हाभरातील मोठ्या संख्येने व्हॉलीबॉलप्रेमी उपस्थित होते.ही स्पर्धा शनिवार (दि. 4 एप्रिल) व रविवार (दि. 5 एप्रिल) या दोन दिवसांत दिवस-रात्र अशा स्वरूपात खेळवली जाणार आहे. उद्घाटनाचा सामना संभाजीनगर व मालेगाव संघांमध्ये रंगला.यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले की, सोनई व नेवासा तालुक्यात क्रीडा संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील काळातही तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्या माध्यमातून तालुक्याचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष राख, डॉ. रामनाथ बडे, भाऊसाहेब गडाख व अनिल गडाख यांनी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







