नेवासा –नेवासा तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणीला ती अल्पवयीन असल्यापासून तिला धमकी देवून शारीरिक संबंध ठेवले तसेच डिसेंबर २०२५ मध्ये फसवून रजिस्टर लग्न केल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली असून या प्रकरणी एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे..
याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नांदूरशिकारी येथील गणेश रमेश राजमाने याने तुला व तुझ्या भावाला गाडीखाली घालून मारुन टाकू अशी धमकी देवून २०१९ पासून माझे इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. तसेच डिसेंबर २०२५ मध्ये फसवून माझ्याशी
लग्न करुन शारीरिक व मानसिक त्रास दिला.

रोहन अरुण लिपणे, प्रकाश मोहन म्हसरुप, महेश बाळासाहेब वेल्हाळ यांनी धमकी देवून गुन्ह्यात सहाय्य केले. तर ओंकार पांडुरंग घोडके रा. केळपिंपळगाव ता. आष्टी जि. बीड याने फसवून दबाव टाकून माझ्या सह्या घेवून गणेश राजमाने याचेसोबत लग्न करण्यास भाग पाडले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७४, ३१८(४), ५४, ३५१ (२), ३५२, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ५ (एल), ६, ९ (एल), १०, १७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







