नेवासा : मौजे मक्तापुर ते म्हसले रस्त्याचे काम मागील ०४ महिन्यापासून बंद झालेले आहे, त्यामुळे सदर रस्त्यावरून येणाऱ्या शाळकरी मुलांची व प्रवाशांचे खूप हाल होत आहे, त्यामुळे सदर रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ चालू व्हावे यासाठी प्रशासनाने सबंधित ठेकेदार यांना सुचना देऊन सदर काम तत्काळ चालू करावे अशी मागणी मराठा सूकाणु समितीचे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, श्री. गणेश लक्ष्मण झगरे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब आहिल्यानगर तसेच मा. सार्वजनिक बांधकाम कार्यालय, आहिल्यानगर यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे,

तरी प्रशासनाने सदर निवेदनाचे दिनांक १३ एप्रिल २०२६ पर्यंत दखल न घेतल्यास व सदर रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी सबंधित ठेकेदारास सुचना न दील्यास दिनांक १४/०४/२०२६ रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी श्री. गणेश लक्ष्मण झगरे, (मराठा सूकाणु समिति प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य.) व मक्तापुर व म्हसले ग्रामस्थासह रास्ता रोको आंदोलन करणार आहे अशी सुचना निवेदनाद्वारे प्रशासनास दिलेली आहे. या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे कारण म्हणजे भारताच्या सांविधनाचे निर्माते आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने मानवंदना होईल. व राज्यघटनेनुसार सदर आंदोलन करण्याचा अधिकार माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाला आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेला आहे. तरी प्रशासनाने सदर दिलेल्या निवेदनाची वेळेत दखल घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






