आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
राष्ट्रकुल संसदीय संघ
राष्ट्रकुल संसदीय संघ

नेवासा : गोवा राज्यातील पणजी येथे राष्ट्रकुल संसदीय संघ (CPA) भारत क्षेत्र ‘विभाग-७’ ची पहिली ऐतिहासिक परिषद आजपासून सुरू झाली आहे. या महत्त्वपूर्ण परिषदेत नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील सहभागी झाले असून, त्यांच्या सहभागामुळे तालुक्याच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

राष्ट्रकुल संसदीय संघ

या परिषदेचे उद्घाटन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते पार पडले. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग, गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. गणेशजी गावकर, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलमताई गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह विविध राज्यांतील आमदार उपस्थित आहेत.

राष्ट्रकुल संसदीय संघ

परिषदेमध्ये ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाच्या पूर्ततेत तरुण आमदारांची भूमिका काय असावी, यावर सखोल विचारमंथन होत आहे. याशिवाय व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि किनारपट्टी कनेक्टिव्हिटी (Coastal Connectivity) या विषयांवरही चर्चा करण्यात येत आहे.

महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यांचा समावेश असलेल्या या परिषदेमुळे प्रादेशिक विकासाला नवी दिशा मिळेल, तसेच राज्यांमधील समन्वय अधिक बळकट होईल, असा विश्वास आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रकुल संसदीय संघ

ते पुढे म्हणाले की, “जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार या परिषदेत करण्यात आला आहे.”

राष्ट्रकुल संसदीय संघ

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राष्ट्रकुल संसदीय संघ
राष्ट्रकुल संसदीय संघ
राष्ट्रकुल संसदीय संघ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राष्ट्रकुल संसदीय संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!