आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गहू
गहू

नेवासा – तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू पिकासाठी शासनाच्या हमीभावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरु करावे, अशी मागणी करत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकरी गहू पिकावर अवलंबून असून यावर्षी अनुकूल हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले आहे. तालुक्यात सुमारे १८,७८६ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची लागवड झाली होती. मात्र, मागील महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गहू

सध्याच्या बाजारस्थितीत गव्हाला शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (₹२,५८५ प्रति क्विंटल) कमी दर मिळत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. काही व्यापारी गव्हाची गुणवत्ता कमी असल्याचे कारण देत केवळ ₹१,८०० ते ₹२,२०० दराने खरेदी करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

तालुक्यात शासनाचे अधिकृत हमीभाव खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने गहू विकण्याची वेळ येत आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असून कमी दरामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

गहू

याशिवाय वाहतूक, मजुरी आणि इतर शेती खर्च वाढल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. शासनाने निश्चित केलेला हमीभाव हा उत्पादन खर्च लक्षात घेऊन ठरवला जात असला तरी प्रत्यक्षात तो मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर नेवासा तालुक्यात तात्काळ गहू खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरु करून खरेदी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच खरेदी केंद्रावर गोदाम, बारदाना आणि शेतकऱ्यांना वेळेवर देयके यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.

गहू

या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, गणेश ढोकणे, राजेंद्र सानप, नारायण लोखंडे, अरुण शिंदे, अण्णासाहेब पटारे, संतोष मिसाळ, अंबादास इरले, बाबासाहेब ढवाण, आसिफ पठाण, गणेश भोरे, अनिल शिंदे, मिलिंद नागे, जालिंदर गवळी, लक्ष्मण जगताप, राजेंद्र काळे, भैय्या काळे, रोहिदास शिंदे, राजेंद्र लोखंडे, निलेश पाटील, सतीश पिंपळे, संजय सुखदान, संभाजी धोत्रे, दिनेश व्यवहारे, अर्जुन नवले यांसह अनेक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांच्या या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गहू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गहू
गहू
गहू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गहू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!