आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अमरण उपोषण

कुकाणा – नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ७ एप्रिलपासून सुरू असलेले अमरण उपोषण आणि धरणे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. प्रशासनाने ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर आंदोलनाला यश मिळाले.

अमरण उपोषण

चिलेखनवाडी (ता. नेवासा) येथील सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अमरण उपोषणासह धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने संबंधित विभागांकडून लेखी आश्वासने देत मागण्यांची पूर्तता करण्याचे मान्य केले.

अमरण उपोषण

प्रशासनाकडून देण्यात आलेली प्रमुख आश्वासने
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांसाठी गावठाण विस्तार वाढवून शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
नवीन रेशनकार्डधारकांची रेशनकार्डे ऑनलाइन करून त्यांना धान्य उपलब्ध करून दिले जाईल.
श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित लाभार्थ्यांचे बंद पडलेले अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी गावात विशेष कॅम्प घेऊन त्रुटी दुरुस्त केल्या जातील.

अमरण उपोषण

शासकीय जागा उपलब्ध होईपर्यंत मंजूर घरकुले रद्द होणार नाहीत, असे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी स्पष्ट केले.
२२ एप्रिलपासून शिवरस्त्यांची मोजणी करून ते खुले करण्यात येतील, असे भूमिअभिलेख विभागाने लेखी आश्वासन दिले.
चिलेखनवाडी बसथांब्यावर नेवासा डेपोच्या सर्व एसटी बस थांबतील, असे डेपो व्यवस्थापकांनी सांगितले.
जलजीवन मिशनअंतर्गत बंद पडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात येतील, असेही प्रशासनाने मान्य केले.

सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर नायब तहसीलदार संदीप चिंतामणी यांनी सरपंच भाऊसाहेब सावंत यांना लिंबूपाणी देऊन उपोषण सोडवले.

अमरण उपोषण

यावेळी उपस्थित मान्यवर

या वेळी नेवासा तालुका लोकसेवक सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद आरगडे, शिवपानंद रस्ते चळवळीचे नाथाभाऊ शिंदे, राजेंद्र गरड, बाळासाहेब थोरात, उपसरपंच नाथा गुंजाळ, देविदास सावंत, सुहास गायकवाड, रमेश सावंत, रामदास कांबळे, संजय गुंजाळ, शेषराव भातंबरे, शब्बीर इनामदार, सुरेश कांबळे, विकास कांबळे, चंद्रकांत पाडळे, प्रभाकर खंडागळे, गुलाबराव गायकवाड, अनिल दुकळे, सुनील गायकवाड, गौरव कांबळे, नवनाथ लोंखडे, अरुण सावंत, लक्ष्मण लोखंडे, सुनील दळवी, पांडुरंग मुरकुटे, पांडुरंग सावंत, रंगनाथ भातंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांमध्ये समाधान

प्रशासनाने सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता प्रत्यक्ष कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अमरण उपोषण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अमरण उपोषण
अमरण उपोषण
अमरण उपोषण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अमरण उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!