
कुकाणा : येथील जाणता राजा ग्रुप सावता आणि समता परिषदेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागेश गवळी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना कार्यगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जाणता राजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील गर्जे व समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल जावळे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील साईश्रध्दा लॉन्स येथे शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी महंत आवेराजजी महाराज यांच्याहस्ते तसेच माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार विठ्ठलराव लंघे, अॅड. देसाई देशमुख, पोलीस निरीक्षक महेश पाटील, समता परिषद जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, विभागीय अध्यक्ष मच्छिद्र गुलदगड, रावसाहेब जावळे, सावता परिषद प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी, प्रधान महासचिव डॉ. राजीव काळे, कॉ. बाबा आरगडे, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडुभाऊ काळे, सरपंच लताताई अभंग यांची प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमास लाभणार आहे.
कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जाणता राजा ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुनील गजें, उपाध्यक्ष राहुल जावळे, युवानेते अमोल अभंग यांनी केले आहे. पुरस्कारार्थीमध्ये सुमतीताई घाडगे पाटील-त्रिमूर्ती शैक्षणिक संस्था नेवासे फाटा (शैक्षणिक), विकास अंत्रे वृत्त संपादक दैनिक पुण्यनगरी व साहित्यिक (साहित्य), अक्षय बोराडे-शिव ऋण प्रतिष्ठान, जुन्नर (सामाजिक), मतीन भोसले आदिवासी आश्रमशाळा, अमरावती (सामाजिक), विजय देशमुख-सुलतानपूर, ता. नेवासे (कृषी), फुलचंद अण्णा रोकडे शेवगाव (सामाजिक), रावसाहेब मगर-शरणपूर वृद्धाश्रम, कौठा, ता. नेवासे (सामाजिक) यांचा समावेश आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







