घोडेगाव— नेवासा तालुक्यातील चांदा येथुन कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १२ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास कुरेशी मोहल्ला चांदा येथे राज्यामध्ये गोवंशीय जनावरे यांची हत्या करण्याची मनाई असताना येथील मोहल्ल्यात काही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवुन अमानुष पणे वागवत त्यांना इरशाद कुरेशी, आसद शेख, साजीद कुरेशी सर्व राहणार चांदा यांनी विना चारा पाणी चे बांधून ठेवुन अमानुष पणे वागणूक दिलेली आहे.

त्या ठिकाणाहून पन्नास हजार रुपये किंमतीचे गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. फिर्यादी नवनाथ भागीनात दंडवते (वय.४१) रा. ब्राम्हणी ता. राहुरी यांनी सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार गुन्हा र. नं. १२५/२०२६ महाराष्ट्र पशु संरक्षण अधि नियम कलम ५(अ)(ब), ९ सह प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






