आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा

घोडेगाव— दि. ३१मार्च रोजी दुपारी ४.३७ वाजण्याच्या पुर्वी येथील जलजिवन मिशन तलावात प्रथमेश सुभाष काळे (वय.१७), जिवण रविंद्र आव्हाड, (वय.१७), शोयब अय्युब शेख(वय.१७) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. सदर तलावाचे बांधकाम दि. ७ आॅक्टोबर २०२२ रोजी सुरू करण्यात आले होते. ते दि. ६ मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु ते आजतागायत पुर्ण होवू शकले नाही. तसेच तलावाचे बांधकाम चालू असताना मुळा उजवा कालव्याच्या पाण्याचा विसर्ग चालू असून त्याचे पाणी झिरपून तलावात येत असतांनाही त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे उपाय योजना केलेली नाही.

गुन्हा

तसेच तलावाच्या लगत च सोनई घोडेगाव, शिंगणापूर जाणारा वर्दळीचा रस्ता असून ठेकेदारांनी संरक्षण भिंत अगर कुंपण केलेले नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारे सुचना फलक लावलेले नाही. किंवा सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली नाही. दि.३१ रोजी माझा मुलगा व त्याचे दोन मित्र हे त्या जलजिवन मिशन तलावात बुडून मयत झाले होते. त्यांच्या या मृत्युस संबंधित ठेकेदार कारणीभूत आहे. दि. १० रोजी सोनई पोलीस ठाण्यात सुभाष वैजनाथ काळे (वय.४६) यांनी योगेश काशिनाथ हिंगणे रा.बारामती, के के थोरात रा. संगमनेर या ठेकेदाविरुध्द गुन्हा र. नं. १२२/२०२६ बिएन एस चे कलम १०५,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.

गुन्हा
गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!