नेवासा –तालुका विद्या प्रसारक मंडळाच्या येथील कै. सौ. बदामबाई धनराजशेठ गांधी विद्या मंदिर शाळेतील १० सीसीटीव्ही कॅमेरे चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत मुख्याध्यापकांच्या फिर्यादीवरुन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, १ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता मी तसेच माझे इतर कर्मचारी शाळेत आलो असता शाळेतील स्टाफ रुम, संगणक,प्रयोगशाळा ग्रंथालय व इतर दोन खोल्याचे दरवाजाचे कडी, कुलुप तुटलेले होते.

तेव्हा शाळेतील खोल्यात जावुन पाहणी केली असता शाळेतील सी.सी.टी.व्ही. कॅमेरेच्या वायरी कट केलेल्या दिसल्या. तसेच खोल्यातील व शाळेचे परीसरातील १० हजार रुपये किमतीचे १० सीसीटीव्ही कॅमेरे तसेच-३००रुपये किमतीची इलेक्ट्रीक केबल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे दिसून आले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






