आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आंबेडकर

नेवासा-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नेवासा फाटा येथे अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. नेवासा फाटा मुकिंदपूर चे सरपंच सतीश दादा निपुंगे यांच्या पुढाकाराने प्रथम ग्रामपंचायत मुकिदपूर येथे आंबेडकर जयंती प्रतिमेला पुष्पहार घालून व मानवंदना देऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ,या प्रसंगी आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ,यानंतरआंबेडकर नगर परिसरात बाबासाहेबांची भव्य दिव्य मूर्ती स्थापन करून भीमसैनिकांनी जल्लोषात जयंती साजरी केली.

आंबेडकर


कार्यक्रमाच्या प्रारंभी मोठ्या संख्येने उपस्थित भीमसैनिकांच्या साक्षीने मूर्तीचे अनावरण करण्यात आले. यानंतर बौद्ध भिक्खू भनतीजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बुद्ध, धम्म आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा दिली.
त्यानंतर आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम घटनापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
याच वेळी नेवासा फाटा येथील न्यू फ्रेंड्स कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ च्या वतीने पोलीस पाटील आदेश साठे व आणि सराफ असोसिएशन चे दहिवाळकर सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत रक्तदात्यांची मोठी रांग लागली.

आंबेडकर


कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी भेट देत रक्तदात्यांना मार्गदर्शन केले व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम रक्तदान गणेशराव झगरे पाटील यांनी करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. त्यानंतर रवी भालेराव यांनीही स्वतः रक्तदान करत प्रेरणादायी संदेश दिला.
सराफ असोसिएशनचे अध्यक्ष दहिवाळकर पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर पोलीस पाटील आदेश साठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांनीही कार्यक्रमास भेट देत आंबेडकर चौक तसेच रक्तदान स्थळी बाबासाहेबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच आंबेडकर नगर येथे नव्याने स्थापित मूर्तीला मानवंदना देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

आंबेडकर


नेवासा फाट्यावर झालेल्या या भव्य सोहळ्याने एकच संदेश दिला – “बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत, आणि समाज त्यांच्या मार्गावर ठामपणे चालत आहे!” या कार्यक्रमाप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सतिश निपुंगे, माजी सरपंच विजु भाऊ गाडे, कानिफनाथ कराडे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब केदारे, एडवोकेट करडक, घटनापती प्रतिष्ठान चे रवि भालेराव, एडवोकेट सुदाम ठुबे, राजेंद्र वाघमारे , मुन्ना चक्रनारायण,राजेंद्र साळवे सुनील वाघमारे, गणपत मोरे, नगरसेवक कृष्णा परदेशी, माजी नगरसेवक सचिन वडागळे, पोपटराव सरोदे, किशोर जोजार,अमोल घुले, संजय निपुंगे,संतोषमामा निपुंगे,मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाऊ झगरे, पत्रकार राजेंद्र वाघमारे, लोक परिवर्तन चे संपादक आबासाहेब शिरसाठ,

आंबेडकर

शिव महाराणा प्रताप मित्र मंडळ संस्थापक बादलभाऊ परदेशी, राहुल शेठ कत्तेवार, विजय अंकल गायकवाड, संजय बनसोडे प्राध्यापक सातुरे सर, भास्करमामा लिहिणार, इरफान शेख, निखिल चंदानी,दयानंद खिलारी, कृष्णा अवताडे ,बबलू शिरसाट,संजय बनसोडे,पत्रकार ज्ञानेश सिन्नरकर, दत्ता काळे, गोटू पडोळ,अनिता ताई कांबळे, वनिता ताई कांबळे, मिराताई जाधव, उपळकर दादा,कसबे सर, आगळे सर, नितीन गायकवाड सर, मुकिंदपुर व परिसरातील असंख्य भिमसैनिक उपस्थित होते
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी नेवासा पोलीस प्रशासनाच्या वतीने चौख असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजू काळे, बंटी काळोखे, पोलीस कॉन्स्टेबल आव्हाड यांनी आपली भूमिका बजावली व कार्यक्रम शांततेत संपन्न झाला.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!