आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आंबेडकर

नेवासा –तालुक्यातील सुरेगाव (गंगा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८ वाजता सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात रवी भालेराव यांच्या भाषणाने झाली ते बोलताना म्हणाले की, १४० कोटी जनतेने आज चौका चौकात भीम जयंती साजरी केली. शिवरायांनी रयतेचे राज्य तयार केले. मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये देव पाहिला.

आंबेडकर

महात्मा फुलेंचा आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत आपल्या मनोगतातून बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण, समता, स्वातंत्र्य व बंधुतेच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी भाषणातून प्रिया भालेराव, गौरव गायकवाड यांनी “शिका संघटित व्हा! संघर्ष करा”आणि “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे! जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रेरणादायी विचार सांगितले.
या कार्यक्रमास रवी भालेराव,बाबासाहेब शिंदे, नितीन भालेराव,ऋषिकेश पारखे, संदीप भालेराव, गणेश कनगरे , सुनील गायकवाड आदी पुरुष व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता त्रिशरण पंचशील या प्रार्थनेने आणि जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीने करण्यात झाली.

आंबेडकर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आंबेडकर
आंबेडकर
आंबेडकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आंबेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!