नेवासा – नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
करण्यात आली.समाज परिवर्तनासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आज खरी गरज असून त्यांचे साहित्य आत्मसात करून जीवनात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन सरपंच ललितभाऊ मोटे पाटील यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले
वडाळा बहिरोबा येथील ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या जयंती कार्यक्रम प्रसंगी पोपटराव कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सरपंच ललितभाऊ मोटे पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

बाबासाहेबांचे भारतीय राज्यघटने बद्दलचे योगदान,महाड चवदार तळे सत्याग्रह, बौद्ध धम्माची दिक्षा याबाबत त्यांनी मनोगत व्यक्त केले. विश्वनाथ शेळके सर यांनी बाबासाहेबांचे भारतीय अर्थव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, भारतीय राज्यघटना, समता, स्वतंत्र्य, बंधुता याबद्दल मनोगत व्यक्त केले
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे समन्वयक संतोष तेलतुंबडे यांनी बाबासाहेबांचे भारतीय राज्यघटनेतील योगदान, दामोदर प्रकल्प, हिराकूड, भाक्रानांगल धरण निर्मिते व त्यांची दूरदृष्टी,स्रिया, कामगार यांचे अधिकार ई. विषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच सचिन मोटे,बाबासाहेब मोटे,राहुल मोटे,तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब मोटे,प्रतीक मोटे,निखिल मोटे,लहुतात्या मोटे, अशोक कांबळे,सागर तेलतुंबडे, सुरेश पाटीलबा मोटे, आतिष गायकवाड,लक्ष्मण मोटे,श्रीकांत मोटे, सुनिल पतंगे, सागर बहादुरे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक माळवे दादा व त्यांचे सहकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







