आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल

शनिवार दि.११ एप्रिल २०२६ रोजी नेवासा तालुक्यातील सीबीएसई पॅटर्नचे रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल, हंडीनिमगाव येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत राज्यात आपला ठसा उमटवला आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.

इयत्ता पाचवीत शिकणारी कु. तांबे स्वरा प्रदीप हिने गणित विषयात महाराष्ट्रात तिसरा क्रमांक मिळवत रुपये १२०० ची स्कॉलरशिप पटकावली आहे. तसेच इयत्ता आठवीतील कु. मते हर्षल रामेश्वर याने इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत गणित विषयात महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवत रुपये १००० ची स्कॉलरशिप मिळवली आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे शाळेचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे.

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल

या यशामागे संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब अंबाडे पाटील, शाळेचे मुख्याध्यापक पिटर बारगळ तसेच ऑलिम्पियाड मार्गदर्शक शिक्षक योगेश खैरे, अतुल पटारे, गणेश सोनटक्के, मुक्ता जपे, विद्या करांडे, संगिता पारखे, सोनाली कराळे, कोमल घोरपडे, कोमल गांगुले, अनिता इंगळे, निलिमा भोसे व सिमा मरगळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

ह्या वर्षी जवळपास २१० विद्यार्थ्यांनी ऑलिम्पियाड परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांना ‘एक्सलन्स अवॉर्ड’ तर २६ विद्यार्थ्यांनी ‘क्लास टॉपर’ म्हणून मानांकन मिळवले आहे, ही बाब शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला शाळेचे डायरेक्टर अजित अंबाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान शाळेचे डायरेक्टर अजित अंबाडे, प्रिन्सिपल पिटर बारगळ व योगेश खैरे यांच्या हस्ते मेडल्स, सर्टिफिकेट्स व डिस्क्रिप्टिव्ह कार्ड देऊन करण्यात आला.

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल

या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून जून महिन्यात राज्यातील टॉपर्स विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान स्कॉलरशिप व ट्रॉफी देऊन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही असेच यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल
रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल
रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!