आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
खुपटी पोटनिवडणूक
खुपटी पोटनिवडणूक

खुपटी पोटनिवडणूक | नेवासा – तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या खुपटी गावातील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा बदल घडला आहे. सुरुवातीला तब्बल १२ उमेदवारांनी अर्ज दाखल करत निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी तब्बल ९ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणूक केवळ ३ उमेदवारांमध्येच रंगणार आहे.

खुपटी पोटनिवडणूक

१७ एप्रिल २०२६ हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी सोमनाथ वरुडे, दत्तात्रेय वरुडे, डिगंबर ससे, रमेश घोरपडे, अमोल गव्हाणे, सुनील गव्हाणे, किशोर कुहे, प्रकाश कालें आणि नीळकंठ ससे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

खुपटी पोटनिवडणूक

या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी पाहता, माजी सरपंच दत्तात्रेय क्रुडे यांनी ६ सप्टेंबर २०२४ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक लागली होती. विशेष म्हणजे, त्यांनीच पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या निवडणुकीबाबत गावात आणि परिसरात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

खुपटी पोटनिवडणूक

माघारीनंतर आता गोरक्षनाथ तनपुरे, अशोक चौधरी आणि भीमा गोरक्षनाथ कारले हे तिघे उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामुळे लढत अधिकच चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीची जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. जाधव यांच्याकडे असून, २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर २९ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडेल आणि खुपटी गावाला नवा सरपंच मिळणार आहे.

खुपटी पोटनिवडणूक

दरम्यान, उमेदवारांची संख्या कमी झाल्यामुळे आता प्रचार अधिक थेट आणि तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमका कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

खुपटी पोटनिवडणूक

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

खुपटी पोटनिवडणूक
खुपटी पोटनिवडणूक
खुपटी पोटनिवडणूक

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

खुपटी पोटनिवडणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!