खऱ्या शिवसैनिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चांडाळ चौकडी भेट होऊ देत नसल्याचा केला आरोप!

नेवासे – उबाठा शिवसेनेच्या वरिष्ठ पक्ष नेतृत्वातील चांडाळ चौकडींवर चौफेर टिकेचा भडीमार करत खऱ्या निष्ठावान पदाधिकारी आणि शिवसैनिकांना आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समक्ष भेट घेणे ही सुद्धा मोठी मुश्किल बाब झालेली असून नेवासे नगरपंचायतीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवसेनेच्या मशाल चिंन्हावर नगरपंचायतीची निवडणूक न लढविता त्यांनी थेट क्रांतिकारी पक्षाच्या चिंन्हावरच ही निवडणूक लढविल्यामुळेच आपण या निवडणुकीत अपक्ष उभा राहिलेलो होतो आणि मला शिवसेनेचे मशाल चिन्ह न मिळाल्यामुळेच माझा या निवडणुकीत पराभूत झाल्याचे शल्य मनात ठेऊन वरिष्ठ शिवसेना नेते हे पक्ष वाढविण्यापेक्षा कमजोर करत असल्याचे ठिकास्त्र शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वावर सोडत नेवासे शहर उबाठा सेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप, युवा आघाडी जिल्हाप्रमुख नीरज नांगरे आणि युवा आघाडीचे शहराध्यक्ष सागर शिंदे यांनी आपले पदाचे एकत्रित राजीनामे देत थेट पत्रकार परिषद घेवून शिवसेना नेतृत्वावर यावेळी गुरुवारी (दि.२३) रोजी चांगलीच आगपाखड केली.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना नितीन जगताप म्हणाले की,मी वयाच्या १७ व्या वर्षांपासून सतत शिवसेनेत एकनिष्ठपणे काम करत आलेलो आहे माझ्या २० – २५ वर्षाच्या या कालावधीमध्ये नेवासे शहरावर कायमच शिवसेनेचे वर्चस्व राहत आलेले आहे आणि धर्मवीर स्व. आण्णाभाऊ लष्करे यांनी पहिल्यांदाच नेवासे पंचायत समिती निवडणूक लढवून ते २००७ मध्ये पहिले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून येऊन त्यांनी सर्वप्रथम नेवासे तालुक्यात शिवसेनेचे खाते उघडून या पंचायत समितीवर भगवा फडकविलेला होता.

त्यानंतर सन २०१२ मध्ये स्व.आण्णाभाऊ लष्करे यांच्या भक्कम साथीमुळे पुन्हाः नेवासे पंचायत समितीवर शिवसेनेचा उमेदवार निवडुन आलेला होता नेवासे शहरात पाच वर्षे उपसरपंच पद हे शिवसेनेकडे होते त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिकांनी शिवसेना पक्षवाढीसाठी नेवाश्यात आमच्यावर केसेस, गुन्हे, जेल आणि मानसिक त्रास अशा अनंत वेदना नेहमी पक्षासाठी सहन करत आलेलो असतांना मात्र नुकत्याच झालेल्या नेवासे नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपण पक्षाचा पॅनल तयार केलेला होता आणि नगराध्यक्ष या पदासाठी अनेक उमेदवारही इच्छुक होते.

त्यामुळे नितीन जगताप हे मुंबई येथे मातोश्रीवर पक्षाचा एबी फॉर्म आणण्यासाठी मुंबईला गेल्यावर जगताप यांना शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी सांगितले की, नेवासे येथे एबी फॉर्म देता येणार नाही? असे सांगून जगताप यांना त्यांचे म्हणणे सुद्धा उध्दव ठाकरे यांच्या समोर मांडता आलेले नव्हते त्यामुळे जगताप यांनी नेवासे नगरपंचायतीची ही निवडणूक अपक्ष लढविलेली होती आणि आपल्याला मशाल चिन्ह मिळालेले नसल्यामुळे आपला पराभव झालेला होता असे सांगून ते म्हणाले की, क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या नावावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ही निवडणुक लढविली होती.

पण त्यांनी जर शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणुक लढविली असती तर मी माझी अपक्ष उमेदवारी थांबुन घेतली असती? कारण आम्ही पक्षाचा आदेश मानणारे खरे शिवसैनिक आहोत असे सांगून जगताप म्हणाले की, ४ ते ५ वर्षापुर्वी पक्ष पुठला, आमदार गेले, खासदार गेले? पण आम्ही पक्षासोबत कायम एकनिष्ठ आणि प्रामाणिकपणे राहिलेलो आहोत आणि त्याचे जर हे फळ आम्हाला मिळत असेल? तर मी उध्दव साहेबांचा काल पण आदर करत होतो, आणि आज पण आदर करतो, पण हे जे खालचे वरिष्ठ नेतेमंडळी पक्षाचे वाटोळे करण्याचे काम करत आहेत त्यांनी आम्हाला या नेवासे नगरपंचायतीची निवडणुक होवुन ७ महिने झाले तरी पक्षाने आम्हाला काही देखील विचारलेले नाही? त्यांनाच जर पक्षाचे काही देणे – घेणे नसेल? तर आपण शिवसेनेत राहून काही उपयोग नाही? असे परखड मत मांडत आणि ठिकास्त्र सोडत उबाठा शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी आपले यावेळी एकत्रित राजीनामे देवून सेना नेतृत्वावर आरोप करत हे राजीनामे दिलेले आहेत.
नेवासे शहरात शिवसेनेचे कट्टर निष्ठावान समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरप्रमुख नितीन जगताप यांच्यासह युवा आघाडीचे शहरप्रमुख सागर शिंदे आणि युवा आघाडीचे जिल्हाप्रमुख नीरज नांगरे यांनी एकत्रितपणे उबाठा सेनेचे राजीनामे देवून जय महाराष्ट्र केला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







