
घोडेगाव–– नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथील अमरधामाची दिवसेंदिवस दुरावस्था होत चालली आहे. येथे अंत्यविधीवेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रात्रीच्या वेळी जर एखादा अंत्यविधी करायची वेळ आली तर त्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही,पर्यायाने मोबाईल च्या लाईट मध्ये अंत्यविधी करावा लागतो. रक्षा सावरण्याचा विधी, दशक्रिया विधी, श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी ध्वनी क्षेपक नाही, येथील मुख्य दरवाजा ची देखील मोडतोड झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी सोलर पॅनल लाईट बसवणे जेणेकरून लोडशेडिंग चा सामना करण्याची वेळ येणार नाही.

वरील सुविधा जर वेळेत झाल्या नाही तर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. तशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहील्यानगर, गटविकास अधिकारी पंचायत समिती नेवासा, गणेशवाडी ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहे. गणेशवाडी सेवा सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अक्षय लोहकरे, भाऊसाहेब शेटे, देवीदास गडाख, सुधीर लोहकरे, निवृत्ती लोहकरे, निवृत्ती तांदळे, रमेश बेल्हेकर, संदिप लोहकरे, अर्जुन बेल्हेकर सह आदी ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







