आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गर्भलिंग निदान

नेवासा-दि.२९/०४/२०२६ रोजी मा.श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर यांना गोपनिय बातमी मिळाली की, काही इसमांकडुन पिंपरी निर्मळ शिवारात, ता. राहाता येथील निळवंडे कॅनॉल शेजारी असलेले खोलीमध्ये महिलांकडुन १०,०००/- रु. घेवुन त्यांची बेकायदा गर्भलिंग निदान तपासणी करण्यात येत असल्याबाबत बातमी मिळाली होती. सदर बातमी वरुन अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील व लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमंलदार यांनी वैदयकीय अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय लोणी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, त्यांचेसोबत तालुका समुचित प्राधिकारी पी.सी.पी.एन.डी.टी. तसेच दोन शासकीय पंच यांनी बातमीतील सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन चारही बाजुन घेरुन तेथे छापा टाकुन सदर ठिकाणावरुन

गर्भलिंग निदान

१) डॉ. राहुल आबासाहेब भनगे, वय ३४ वर्ष, धंदा बी.ए.एम.एस. डॉक्टर, रा. भानसहिवरे, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर २) अभिजीत दिलीप भुसाळ, वय ३० वर्ष, धंदा- जे.एन.एम. नर्सिंग, रा. पिंपरी निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना ४,५०,०००/-रु. किं.चे. लाईफ प्लस यु.एस.जी. लॅपटॉप प्रोब मशीन चार्जरसह, गर्भलिंग तपासणी वेळी गरोदर महिलांचे पोटावर लावण्यासाठी वापरण्यात येणारे जेल, टीशु पेपर, ४ मोबाईल फोन, ५९,०००/- रुपये रोख रक्कम, कागदी चिठया, एक सिल्वर रंगाची स्विफ्ट कार नं. एम.एच.१२ एच.व्ही. ९४३६, एक पांढरे रंगाची इर्टिगा कार नं.एम.एच.१४ एच.डब्लु. ८६४२ एक लाल रंगाची वॅगनर कार एम.एच.१७ सी.आर ४१६० असा एकुण २४,०९,१००/- रुपये किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

गर्भलिंग निदान

सदर गुन्हयाचे तपासामध्ये अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर यांना गुप्त बातमीदार मार्फत व तांत्रिक विष्लेषणाचे आधारे सदर गुन्हयास मदत करणारे तसेच अशा प्रकारचे रॅकेट चालवणारे व गर्भवती महिला व डॉक्टर यांचेमध्ये समन्वय घडवुन आणणारे २ एजंट नामे १) प्रदिप भाऊसाहेब ढगे, वय ३२ वर्ष, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर २) निलेश ज्ञानेश्वर भवर, वय ४२ वर्ष, रा. नपावाडी ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांचा ही सहभाग असल्याचे समजले. म्हणुन अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पथक व लोणी पोलीस स्टेशन यांच्या सयुक्त कारवाईने सदर दोनही इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी श्रीरामपुर येथील डॉ. रविंद्र कुटे, यांचाही सहभाग असलेबाबत सांगीतल्याने सदर आरोपी ३) डॉ. रविंद्र कुटे रा.श्रीरामपुर यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचे अटकेमुळे सदर गुन्हयात आणखी काही एजंट व डॉक्टरांचा सहभाग असल्याचे दाट शक्यता असुन त्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.

गर्भलिंग निदान

सदरची कारवाई ही मा. श्री. मुम्मका सुदर्शन साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर, मार्गदर्शनाखाली स.पो.नि. युवराज आठरे, पो.स.ई. आशिष चौधरी, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संदिप दरंदले, पो.कॉ. अशोक गाडे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.हे.कॉ. असिर सय्यद, पो.हे.कॉ. साईनाथ राशिनकर, पो.ना. सचिन शेवाळे, पो.कॉ. भोईटे, म.पो.कॉ. मनिषा गिरी यांनी केली आहे.

गर्भलिंग निदान
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गर्भलिंग निदान
गर्भलिंग निदान
गर्भलिंग निदान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गर्भलिंग निदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!