आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
स्नेहमेळावा

नेवासा – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, नेवासा येथे इयत्ता 10 वी, बॅच 2001 च्या माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात 120 माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

रविवार दि. 17 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मा. रावसाहेब चौधरी सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे उपाध्यक्ष मा.डॉ.विवेक भापकर साहेब, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मा.शंतनू हापसे साहेब लाभले होते.

स्नेहमेळावा

यावेळी सर्वश्री चव्हाण सर, नारळे सर, घुले सर, भापकर सर, बोरुडे सर, आघाव सर, आठरे सर, पाठक सर, ढवळे सर, कुऱ्हे सर, नलगे सर, पवार सर, चावरे सर, पारखे सर, पाटील सर, बोरकर सर हे शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. ॲड. दिपक गायकवाड यांनी अध्यक्षीय सूचना मांडली. सागर जोशी यांनी अनुमोदन दिले. यावेळी दिवंगत गुरुजन वर्ग व माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा.डॉ.रवींद्र वैद्य यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले, तर डॉ. गौतम काळे यांनी प्रास्ताविक केले.

मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी इच्छुक माजी विद्यार्थी व गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

स्नेहमेळावा

प्रमुख पाहुणे मा.शंतनू हापसे साहेब व मा.डॉ.विवेक भापकर साहेब यांनी मार्गदर्शन करताना सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता संवाद कौशल्य, संगणक ज्ञान, व्यावसायिक शिक्षण यांसारखी विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी बॅच 2001 च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत दोन स्तुत्य उपक्रम हाती घेतले. शाळेला अत्याधुनिक डिजीटल बोर्ड भेट म्हणून देण्यात आला. त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांच्या वतीने इ. 10 वी मध्ये दरवर्षी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्याच्या योजनेची सुरवात यावेळी करण्यात आली. सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.गौतम काळे यांनी यावर्षी विद्यालयात प्रथम आलेल्या आदित्य मनेष कुरुंद या विद्यार्थ्याला रोख अडीच हजार रुपये बक्षीस देऊन त्याचे कौतुक केले. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या वतीने यावर्षी दहावी बोर्ड परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

स्नेहमेळावा

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक रावसाहेब चौधरी सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमांचे कौतुक केले. मान्यवरांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. ॲड. जानकीराम डौले यांनी आभार प्रदर्शन केले. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विलास वाघ व प्रा.डॉ.रवींद्र वैद्य यांनी केले. या स्नेहमेळाव्याचे यशस्वी नियोजन करण्यात सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ.गौतम काळे,विलास वाघ यांनी मोलाची भूमिका बजावली. 25 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी दिवसभर शाळेच्या आवारात रमले होते.

स्नेहमेळावा
स्नेहमेळावा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

स्नेहमेळावा
स्नेहमेळावा
स्नेहमेळावा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

स्नेहमेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!