
माका प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शंकररावजी गडाख पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी नेवासा तालुक्यातील माका येथे, एस.एम.बी.टी. हॉस्पिटल व यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय व हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, माका येथील मंकावती देवी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे उद्घाटन युवा नेते उदयन गडाख व डॉ. निवेदिता गडाख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांसाठी शुगर, रक्तदाब, ब्लड ऑक्सिजन, ईसीजी तपासणी तसेच गुडघेदुखी व दातांवरील उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी मेडिसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्र व दंतचिकित्सा विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून आवश्यक सल्ला व मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये तपासणी झालेल्या गरजू रुग्णांवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. माका, महालक्ष्मी हिवरा, पाचुंदा व परिसरातील अनेक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
समाजोपयोगी उपक्रमाबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले. विशेष म्हणजे, शंकरराव गडाख मित्र मंडळ, माका यांच्या वतीने सन २००७ पासून या आरोग्य शिबिराचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा उपक्रम मोठा आधार ठरत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







