आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अर्ज

नेवासा तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता तालुक्यात सहकार राजकारणही तापू लागले आहे. ज्ञानेश्वर, मुळा आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून (दि.२६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

अर्ज

यामध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील मुळा सहकारी साखर कारखाना, आमदार मोनिका राजळे यांच्याशी संबंधित वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मुळा आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून, २७ जून रोजी मतमोजणी केली जाणार आहे. तर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान दि. २७ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार असून, २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

अर्ज

या निवडणुकांसाठी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. तसेच प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांच्याकडे जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

साखर कारखान्यांच्या निवडणुका म्हणजे तालुक्यातील राजकीय शक्तिपरीक्षा मानल्या जात असल्याने इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात प्रचारसभा, मेळावे आणि राजकीय समीकरणांना वेग येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अर्ज
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अर्ज
अर्ज
अर्ज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!