अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी जवळील चंद्रपूर गावात धक्कादायक घटना घडली आहे. साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी जवळील चंद्रपूर गावात धक्कादायक घटना घडली आहे. साठवण तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तिघे पायरेन्स IBMA कॉलेजच्या MBA चे विद्यार्थी होते. तलावातील खड्डयांचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. सोबतच्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक रहिवासी मदतीसाठी धावले. मात्र तत्पूर्वी तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहीती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक गंगाधर जाधव (वय 24, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा) , प्रवीण प्रभाकर रसाळ (वय 23, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) , महेश अशोक शिंदे (वय 26, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मयतांची नावे आहेत. तिघेही MBA च्या दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







